विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन व ऑफलाइन कसे काढावे ? जाणून घ्या सविस्तर माहिती Marriage Certificate
या लेखामध्ये आपण “विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे?” याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. लग्नानंतर महिलांना अनेक कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतात. त्यामध्ये आपले आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी, बँकेमध्ये जॉइंट खात उघडण्यासाठी किंवा जीवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राची आपल्याला गरज भासते.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकार” ची खालील वेबसाईट ओपन करायची आहे.
विवाह नोंदणी करताना तुम्हाला त्या अर्जासोबत काही कागदपत्रे देखील जोडावी लागतात,
त्या कागदपत्रांची यादी खलील प्रमाणे :-
- १) आधार कार्ड
- २) अर्जदाराचा पत्ता पुरावा
- ३) २ पासपोर्ट साइज फोटो
- ४) वराचा जन्म तारखेचा पुरावा
- ५) वधू चा जन्म तारखेचा पुरावा
- ६) लग्न पत्रिका नसेल तर 100 रुपयांच्या स्ट्म्प पेपर.
- ७)वधू व वर यांचे शाळा सोडण्याच्या दाखला.
- ८)वराचे वय हे किमान २१ वर्ष पूर्ण पाहिजे, तर वधू चे वय हे १८ वर्ष पूर्ण हवे


Post a Comment
0 Comments